नवोदय दुध नवा आदर्श निर्माण करेल : युवराज येडूरे

गारगोटी प्रतिनिधी :
दुध उत्पादकांना सक्षमपणे न्याय देण्यासाठी नवोदय दुध संस्थेच्या माध्यमातून युवकांचे प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहेत भविष्यात नवोदय दुध नवा आदर्श निर्माण करेल असे प्रतिपादन महा एन जी ओ समितीचे अध्यक्ष युवराज येडूरे यांनी केले.
वाघापूर येथील नवोदय सहकारी दूध संस्थेच्या दुध उत्पादक सभासदांना कै.सौ.इंदुबाई नागोजी जठार यांचे स्मरणार्थ दूध किटली वाटप कार्यक्रम व भारतीय स्वातंत्र दिनाला 75 वर्ष पुर्तीनिमित्य जिलेबी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस पी मोरे होते.
श्री.येडूरे म्हणाले,महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेनं अग्रेसर रहावे त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.प्राचार्य एस पी मोरे म्हणाले, अल्पावधीतच संस्थेने सभासदांच्या हिताकरिता चांगले पाऊल उचलले असून नेहमीच सभासदांच्या हिताकरिता कार्यरत रहावे.
सदर कार्यक्रमास श्री येडुरे,प्राचार्य मोरे, सचिन संभाजी पाटील (विदर्भ कोकण बँक) असिफ पठाण(महा ई सेवा केंद्र गारगोटी), उत्तम मांडे, अभिजित पाटील, सतीश चौगले, संदीप कुंभार (फौजी), मिलिंद जठार (सहा. अभियंता) भगवान प. कांबळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य प्रवर्तक मधुकर नागोजी जठार यांनी प्रास्ताविक केले तर चेअरमन आण्णासो जठार, व्हा. चेअरमन -सौ. सविता मारुती कामिरकर ,माजी सरपंच व.व्हि के पोवार,संजय जठार, पिंटू भोई,संतोष बरकाळे, संस्थापक अनिल सा. कामिरकर, संग्राम मा. दाभोळे, सचिव दिपक परीट उपस्थित होते.आभार निवृत्ती कामीरकर यांनी मानले.