वाघापूर येथे नागपंचमी उत्सव साधेपणाने संपन्न

मडिलगे प्रतिनिधी : जोतीराम पोवार
वाघापूर (ता. भुदरगड )येथील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ज्योतिर्लिंग देवाची नागपंचमी यात्रा कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रद्द करण्यात आली. आज पहाटे पाच वाजता श्री. व सौ. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सपत्नीक व मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पूजा व आरती करण्यात आली मंदिर समितीच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी सेवक श्रीपती परीट यांचा आबिटकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार आबिटकर यांनी कोरोनाचे संकट टळून पूर्वीप्रमाणे मंदिरात भाविकांचा महापूर पहावयास मिळू दे असे ज्योतिर्लिंगाच्या चरणी साकडे घातले सकाळी दहा वाजता टाळमृदंगाच्या गजरात नागमूर्ती ची मिरवणूक काढून मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. तहसीलदार अश्विनी वरुटे अडसूळ व पोलीस उपनिरीक्षक सतीश महेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर व गावात स्थानिक ग्रामस्थ, व्हाईट आर्मी तसेच पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. यावेळी पुरोहित विजय स्मार्त, शिवाजीराव गुरव, जोतिराम गुरव, सागर गुरव, मधुकर गुरव, यांच्यासह देवस्थान समिती अध्यक्ष अरविंद जठार, उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे, सरपंच सौ. जयश्री कुरडे, उपसरपंच शुभांगी कांबळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सचिव रावसाहेब बरकाळे,दिलीप कुरडे,जोतिराम आरडे, यशवंत जठार, जयसिंग पाटील, रंगराव जठार, अर्जुना जठार, प्रकाश जठार, आनंदा जठार, सुनील जठार, युवराज आरडे, कृष्णात जठार यांच्यासह ग्रामसेवक तानाजी शिंदे तलाठी के एम जरग व पदाधिकारी उपस्थित होते.
चांगभलं चा गजर नाहीच…
वाघापूरची नागपंचमी यात्रा म्हंटले की खाद्य पदार्थांच्या मेजवानी चे स्टॉल, भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले रस्ते व भाविकांनी ज्योतिबाच्या नावानं चांगभलं चा केलेला जय जयकार पहावयास मिळत होता मात्र गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवावे लागत असल्याने याहीवर्षी चांगभलचा गजर झालाच नाही,…