“शिवम संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी”

धामोड प्रतिनिधी : प्रतिश पाटील
राशिवडे ,ता. राधानगरी येथील शिवम सामाजिक व शैक्षणिक संस्था ही ग्रामीण भागात समाजभान ठेवून विविध उपक्रमाद्वारे सामाजिक बांधीलकी जपणारी संस्था म्हणून नावारूपास येत आहे .वर्षभर संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये निराधारांसाठी दत्तक पाल्य योजना , नैसर्गीक आपत्ती , महामारी . मानवी संकटावेळी दातृत्वाचा भूमिकेतून मदत पोहचविण्यात येते .आदरणीय इंद्रजित देशमुख काकाजी , माजी सहाशिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांचा आदर्श व आशिर्वादाने संस्थेचे आदर्शवत कामकाज चालत आहे .
गेल्या वीस दिवसापूर्वी महाभयंकर अतिवृष्टीने शेती , उद्यागांचे प्रचंड नुकसान झाले , अपरिमीत जिवीत व वित्तहानी झाली . या नैसर्गीक आपत्तीने राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी ( म्हासुर्ली ) येथे मोठया प्रमाणात भूस्खलन होऊन वाडीतील वसंत कुपले व सुसाबाई कुपले हे दांपत्य व गोठ्यातील जनावरे दगावली गेली . या ह्दयद्रावक घटनेने परिसरातील समाजमने भेदरून व हादरून गेली . दातृत्वाच्या भावनेने शासकीय व समाजातील संस्था व दातृत्वानी यथाशकक्ती मदत पोहचविली .
राधानगरी तालुक्यातील उपक्रमशील संस्था म्हणून परिचित असणाऱ्या शिवम संस्थेनेही संकटग्रस्त कुुदुंबाला संसारोपयोगी वस्तू , भांडी , कपडे , धान्य यांची मदत पोहचवून सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर टिपुगडे , विश्वस्त प्रा ए एस भागाजे, प्रा पवनकुमार पाटील . श्री विजय मगदूम , केंद्र प्रमुख रंगराव बारगे , श्री डी एस पाटील , गौरी समुहाचे तानाजी पाटील यांच्या वतीने संकटग्रस्त कुटुंबाचे वारस सतीश कुपले यांना मदत पोहचवून सहवेदना जागविल्या. तसेच म्हासुर्ली येथील गुरव बंधूनाही मदत देण्यात आली ,
यावेळी शाखा सल्लागार सुहास तोडकर , हरिश्चंद्र दुरूगुळे , प्रा .पी डी मिसाळ ,डॉ पी आर कुंभार , संदिप नलवडे , सर्जेराव ढेरे , सर्जेराव पाटील , राजाराम -हायकर यांचा सहभाग राहिला.
मदत पोहचविण्यासाठी प्रतिक भागाजे , प्रतिक गोनुगडे , ज्ञानेश पाटील , संदिप भित्तम , शुभम आंबी , शंभू मगदूम , वैभव पाटील या युवा ब्रिगेडनी माहत्वाची भूमिका बजावली.
याप्रसंगी मिडीया प्रतिनीधी व दैनिक सकाळचे छायाचित्रकार राजू कुलकर्णी , तरूण भारतचे युवराज भित्तम , दैनिक पुण्यनगरीचे विशाल कात्रे उपस्थित होते .
या उपक्रमाच्या आर्थिक मदतीसाठी श्रीशैल रावण, तांबडे, शिक्षण विस्तार अधिकारी डी सी कुंभार, पुरोगामी जिल्हाध्यक्ष एस के पाटील, संजय कुंभार, शिवाजी देवाळे, बापूसो बेंडुगळे, संजय शिंदे, डॉ मुकुंद देवळकर, पवन गोनुगडे, मानसिंग पाटील, विजय भितम, महिपती डावरे यांचे मोलाचे योगदान लाभले