ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कूर- कोनवडे- शेणगांव च्या पुरग्रस्त कुटुंबांचे तीन टप्यात शंभर टक्के पुनर्वसन करणार : ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील

गारगोटी प्रतिनिधी :

कूर-कोनवडे-शेणगांव च्या पुरग्रस्त कुटुंबांचे तीन वर्षात ३०-३०-४० या धरतीवर १०० टक्के पुनर्वसन करणार असल्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी भुदरगड तालुक्यातील शेणगांव कूर कोनवडेच्या पूरग्रस्त गावांच्या पाहाणी दौऱ्यात सांगितले. पडलेल्या घरांची जागा लेखी स्वरूपात शासनाकडे वर्ग करून घेणार असल्याचेही ना बंटी पाटील यांनी सांगितले. यासाठी पुरग्रस्त कुटुंबांनी तशा प्रकारची माणसिक तयारी ठेवावी असे प्रतिपादन त्यांनी या पाहाणीवेळी केले.
शेणगांव पाहाणीवेळी बोलताना ना बंटी पाटील म्हणाले की, शेणगांव पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध नसतानाही ती जागा अंन्य मार्गातून उपलब्ध करून देवू पण कोणत्याही परिसिस्थीत पुनर्वसन करू असे आश्वासन ना बंटी पाटील यांनी दिले.यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच सुरेश नाईक म्हणाले की, शेणगांव च्या ९४ घरात पाणी गेले.यातील ७५ घरांना स्थलांतराचे आदेश झाले आहेत.३८ घरांची पुर्णता पडझड झाली आहे.ही घरे राहाण्याच्या योग्यतेची नाहीत.भुदरगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान शेणगांव ग्रामस्थांचे झाल्याचे सरपंच नाईक यांनी याप्रसंगी सांगितले.आमदार प्रकाश आबिटकर यांनीही यावेळी सकारात्मक भुमिका घेवून लोकांना योग्य तो न्याय देणार असल्याचे ते म्हणाले.
यावर्षी आलेल्या प्रचंड महापुरात कूर गावची ४५ घरे तर कोनवडे गावची २६ घरे पाण्याखाली गेली आणि यामध्ये कूर गावची १० घरे तर कोनवडे गावची ११ घरे जमिनदोस्त झाली.या सर्व घरांच्या पडझडीची पाहाणी झाली.या पडझडीची पाहाणी ना बंटी पाटील यांनी केली.कूर येथील शासकिय कॉलनीच्या वसाहतीतही हे पुनर्वसन करणे शक्य असल्याचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी यावेळी सांगितले. कूर गावास अडिच हेक्टर जमिन गायरानची असून कोनवडे गावासही दोन हेक्टर गायरान जमिन उपलब्ध आहे असे ते म्हणाले.शेतीचे पंचनामेही सरसकट करून घेण्याचे आदेश ना.बंटी पाटील यांनी याप्रसंगी दिले.मदतीत कोणत्याही प्रकारची कसूर करणार नसल्याचे ते म्हणाले.या पाहाणी दौऱ्यावेळी माजी आमदार के पी पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सत्यजीतराव जाधव,प्रांत संपत खिलारी, तहसिलदार अश्वीनी वरूटे, गटविकास अधिकारी सारिका पोवार व त्यांचे सर्व प्रशासन अधिकारी,पंचायत समितीचे उपसभापती अजित देसाई, कर्मचारी, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव देसाई, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, अँड. संजय सरदेसाई,गोकूळ चे माजी संचालक दिनकर कांबळे,महेश पिळणकर, भुजंगराव मगदूम, बाळासो गुरव, प्रताप वारके,कूर चे सरपंच अनिल हळदकर, माजी सरपंच वसंतराव चोडणकर, आण्णासो पाटील उपसरपंच सुरेंद्र धोंगडे, संदिप पाटील, मदन पाटील, पांडुरंग कोळी, आण्णासो पाटील, सदाशिव हळदकर, सुनिल भारभल, पांडुरंग हळदकर, भाऊसो पाटील, तानाजी पाटील, संदिप पाटील, पूरग्रस्त कूरचे आनंदा कोळी, डी के कुंभार, तुकाराम पाटील, सर्जेराव पाटील, शिवाजी परिट, लक्ष्मण पाटील, मनोहर माने, के बी देसाई, रमेश देसाई, विठ्ठल पाटील, तलाठी सुरज पाटील, ग्रामसेवक एस एस बारड, कोनवडे सरपंच राणी समाधान पाटील, उपसरपंच सुभाष पाटील, एच आर पाटील, माजी सरपंच पांडुरंग पाटील, आनंदराव व्यकोजी पाटील, पांडुरंग चव्हाण दयानंद सुतार, रवि पाटील, भिमराव पाटील सर आर एच पाटील, ग्रामसेवक अशोक परिट शेणगांव चे उपसरंपच दिनकर कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष गणपताराव जाधव, सदस्य भैरवनाथ कुंभार आदि सर्व सदस्य, माजी सरपंच नामदेव कुंभार,नामदेव भालदार, विश्वनाथ कुंभार,शिवाजी पाटील, संजय कुंभार, नारायण खटावकर, अनिल कोरगांवकर, आल्फ्रेड बारदेसकर, प्रकाश जाबशेट्टी, सुनिल तेली,सुभाष सणगर, बाबालाल महात, तमास बारदेसकर, मेरी थॉमस डिसोजा, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश शिंदे, शेणगांव चे तलाठी आर ए. राठोड, ग्रामसेवक खाडे,ग्रामस्थ आदि उपस्थीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks