कोल्हापूर : पालकमंत्री बंटी पाटील रविवारी भुदरगड तालुक्याच्या दौऱ्यावर; पालकमंत्री पूरग्रस्तांना काय मदत जाहीर करणार याकडे तालुक्याचे लक्ष.

गारगोटी :
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील रविवार दि. ०८ ऑगष्ट २०२१ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून भुदरगड तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहाणी करणार आहेत. पाहाणीनंतर लगेचच पंचायत समिती भुदरगड सभागृहात आढावा बैठक घेणार असल्याची माहिती भुदरगड राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई व बाजार समिती संचालक सचिन घोरपडे यांनी दिली आहे.
भुदरगड तालुक्याची गेल्या महापुराने झालेली अपिरिमित हानी, शेतीचे नुकसान, व घरांची पडझड यांची प्रत्यक्ष पाहाणीसाठी सोमवार ९ ऑगष्ट २०२१ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील येणार असल्याची माहिती भुदरगड तालुका कॉग्रेस कमिटी च्या गारगोटी येथील कार्यालयातून देणेत आली आहे.गेल्या आठवड्यात शिव सेनाच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त महिलांचे डोळ्यातील आश्रू पुसत दहा कोटी देण्याची घोषणा केली होती तर आता जिल्हयाचे पालकमंत्री काय देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी तालुका काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने हजर होते.