हिवताप कार्यालयाकडून गप्पीमासे व ॲबेटींगचा वापर

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
पुरपरिस्थितीमुळे हायवेलगत दलदल, डबकी, नाले व शेततळी निर्माण झाली आहेत. या ठिकाणी डेंग्यु, हिवताप या किटकजन्य आजारांना प्रतिबंध करण्याकरिता गप्पीमासे सोडणे, डासअळी नाशकाचा वापर जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रानुसार डासोत्पत्ती स्थानांची गणना करून त्याठिकाणी गप्पीमासे व ॲबेटींग (अळीनाशक) चा वापर करण्यात आला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे- पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 12 ठिकाणी गप्पीमासे तर 17 ठिकाणी ॲबेटिंग (अळीनाशक) चा वापर करण्यात आला आहे. अनुक्रमे गप्पीमासे व ॲबेटिंग (अळीनाशक) जिल्ह्यातील कणेरी – 10 व 2, उचगांव- 3 व 2, क. सांगाव- 7 व 5, अंबप- 5 व 3, भादोले- 5 व 4, हेर्ले- 2 व 11, आळते- 3 व 4, जयसिंगपूर- 7 व 15, वडणगे- 6 व 3, सांगरूळ- 7 व 9, कळे- 2 व 4 या ठिकाणी ॲबेटिंग (अळीनाशक) चा वापर करण्यात आला आहे. पर्यायाने जिल्ह्यातील 69 ठिकाणी गप्पीमासे तर 79 ठिकाणी ॲबेटिंग (अळीनाशक) वापर करण्यात आल्याची माहिती हिवताप कार्यालयाकडून परिपत्रकाव्दारे देण्यात आली.