ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

नेसरीत शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न; नागरिकांना मास्क वाटप, देशमुखांना श्रद्धांजली.

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. तारेवाडीचे उपसरपंच युवराज पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तावरेवाडी सरपंच दिनकर वळतकर यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. शेकापचे गडहिंग्लज तालुका चिटणीस वसंतराव कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी मीनाताई ठाकरे दुध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव हिडदुगी, श्रावण कांबळे, सुरेश सुतार, बबन कांबळे,  विजय कांबळे, विठ्ठल कांबळे, दिनकर पाटील, संजय भालेकर, एस. व्ही. सपाटे यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते. सहचिटणीस लक्ष्मण नाईक यांनी सूत्रसंचालन केले. माजी ग्रामपंचाय सदस्य प्रशांत नाईक यांनी आभार मानले. शेकापचे विक्रमवीर जेष्ठ माजी आमदार तथा राज्याचे माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या निधन झाले. यावेळी  झालेल्या शोकसभेत माजी सरपंच वसंतराव पाटील गणपतराव देशमुख यांच्या कार्याला उजाळा देऊन नेसरीच्या जुनी नळपाणी पुरवठा योजना मंजूरीचे योगदान विशद केले.  सरपंच वळतकर, शेकापचे आघाडी जिल्हाउपाध्याक्ष नारायण वाईंगडे यांनी श्रद्धांजली वाहून मनोगते व्यक्त केली. दरम्यान कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर शेकापक्षाच्यावतीने नेसरी ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, ग्रामीण रूग्णालय, दुध संस्था, पेट्रोल पंप, शाळा, पेपर वितरक, नागरीकांना मास्कचे वाटप झाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks