९ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त ऑनलाइन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन अनंतशांती सामाजिक संस्थेचा उपक्रम

कुडूत्री प्रतिनिधी :
अनंतशांती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व जिव्हाळा,देहू,पुणे यांचेतर्फ़े ९ ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त सालाबाद प्रमाणे वेषभूषा स्पर्धा आयोजित केल्या या आहेत.देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या क्रांतीकारकांच्या विचारांची व कार्याची मुलांना माहिती मिळावी त्यांच्यातील देशप्रेम वाढत रहावे हा या मागचा उद्देश आहे.
या वेशभूषा स्पर्धेचे स्वरूप असे स्पर्धकाने एक ते तीन मिनिटांचा व्हिडिओ सादर करावा. शब्दोच्चार, पाठांतर,आवाज,धीटपणा यास गुण दिले जातील.स्पर्धेत ज्या क्रांतीकारकांची वेशभूषा केली आहे. त्यांच्या विषयी मोजक्या शब्दांत सांगायचे आहे.स्पर्धा इ.१ली ते ७ वी पर्यंत च्या विद्यार्थींसाठी घेतली जाईल.ती विनाशुल्क असेल. स्पर्धकाने खालील माहिती लिहून पाठवावी.
१) स्पर्धकाचे नाव, शाळेचे नाव,वय,इयत्ता (२०२१-२२) ई
२) व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत राहील. ३)आपले व्हिडिओ 9823766408 या व्हाट्स अप् क्रमांकावर पाठवावेत.
३) स्पर्धेचा निकाल दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी घोषित केला जाईल.विजेत्यांना तीन स्पर्धकांना “गौरवचिन्ह व प्रमाणपत्र” देण्यात येईल. सर्व सहभागींना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येईल.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.