धक्कादायक : गारगोटी येथील व्यक्तीवर मडिलगे खुर्द मध्ये चाकु हल्ला

गारगोटी :
भुदरगड तालुक्यातील मडीलगे खुर्द येथील जोतिर्लिंग मंदिरात सिगारेट ओढणेस मज्जाव केला म्हणून रागातून एकाने चाकूहल्ला केला,यात अजित राजाराम देसाई रा. गारगोटी हे जखमी झाले आहेत, तर चाकूहल्ला करणारा व इतर चार युवकावर भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून या सर्व युवकांना अटक केली आहे.
याबाबतची पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, मडिलगे खुर्द ता.भुदरगड गावचे हद्दीत ज्योतिर्लिंग मंदिर येथे विशाल ज्योतीराम इंगवले आदित्य प्रकाश कांबळे, वैभव संजय कुंभार, शिवराम राजाराम कोळी, आकाश राजेंद्र पाटील सर्व रा. बेलवळे बुद्रुक ता. कागल हे काल सायंकाळी पाचचे सुमारास सिगारेट हातात घेऊन ओढत असताना अजित राजाराम देसाई रा. गारगोटी यांनी त्यांना सिगारेट पिऊन मंदिरात येऊ नका, असे सांगून हटकले. या कारणावरून विशाल ज्योतीराम इंगळे याने त्याचे कमरेला असलेला चाकू काढून अजित देसाई याना तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून चाकूने छातीत मध्यभागी वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्याच्या सोबतच्या इतरानी त्याला मदत केली. अशी फिर्याद अजित राजाराम देसाई यांनी उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे दिली, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मयेकर करीत आहेत.