ताज्या बातम्यामहाराष्ट्र

इचलकरंजीतील पुरपरिस्थितीची पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली पाहणी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

इचलकरंजी परिसरातील पूरपरिस्थितीची आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नदीवेस भागात पुराचे पाणी आल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन घोरपडे नाट्यगृहातील तात्पुरत्या स्थलांतरित पूरग्रस्तांना भेट दिली. येथील पुरग्रस्तांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात भोजनाचे ताट देण्यात आले. दरम्यान पालकमंत्री श्री पाटील यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. येथील पंचगंगा नदी उपसा केंद्रानजिक असणाऱ्या महावितरण विभागाच्या उपकेंद्राला भेट देवून पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. भविष्यात पूरपरिस्थिती मुळे नुकसान होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी चर्चा केली.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजूबाबा आवळे, इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऍड अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल तसेच पदाधिकारी, अधिकारी, पूर बाधित नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks