शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख निधन

सांगोला प्रतिनिधी :
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (वय 94) यांचे शुक्रवारी रात्री सोलापुरातील खासगी रूग्णालयात निधन झाले. विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा दक्षिण भारतातील द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. सांगोला विधानसभा मतदार संघातून ते तब्बल 11 वेळा निवडून आले होते.
महाराष्ट्र विधानसभेवर सर्वाधिक काळ निवडून गेलेले कर्तव्यदक्ष आमदार असा त्यांचा लौकीक होता. सत्यशोधकी विचारांवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली.त्यांचे संपूर्ण आयुष्य कृतीशील विचारांचा वस्तुपाठ आहे.
त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिले.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय महत्वाचे व महाराष्ट्राच्या विकासावर सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घेतले.त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.