ताज्या बातम्यामहाराष्ट्र
लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉल जवळील पूरग्रस्त परिसरास महापौर निलोफर आशकिन आजरेकर यांनी दिली भेट

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉल जवळील पूरग्रस्त परिसरात महापालिका व प्रशासन कडून पंचनामा करण्यात सुरवात केली त्या ठिकाणी महापौर सौ निलोफर आशकिन आजरेकर यांनी भेट दिली.
यावेळी पंचनामा कर्त्यावेळी लोकांचे काही कागदपत्रे पुरात भिजले आहेत त्यामुळे कोणतीही आडकाठी करू नये , विभक्त कुटुंब यांचे वेगळे पंचांनामे करावे व कोणीही पंचनामा पासून वंचित राहू नये या सर्व सूचना संबंधीत अधिकारींना देण्यात आल्या ,झालेल्या नुकसानाची जास्तीतजास्त भरपाई मिळवण्यासाठी शासन दारी पाटपुरवठा करण्याची ग्वाही भागातील पूरग्रस्त नागरिकांना दिली,यावेळी कोल्हापूर महानगपालिकेचे अधिकारी,तहसीलदार कार्यालयाचे क्लार्क , व भागातील नागरिक उपस्थित होते.