ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

कोल्हापूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे -माजी मुख्यमंत्री फडणवीस आले आमने सामने

कोल्हापूर प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी एक घटना आज कोल्हापुरमधील शाहुपुरी चौकात घडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते असेलेले देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी समोरासमोर आले होते. राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी हे दोन्ही नेते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज ते कोल्हापुरात आलेले असताना, शाहुपुरी चौकात हे दोघेही समोरासमोर आले व त्यांच्या काही चर्चा झाल्याने, राज्यभर या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर, या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीवेळी प्रचंड गर्दी झाल्याचेही दिसून आले. यावेळी नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नेमकी काय चर्चा झाली याबाबत माध्यमांना माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमची तिथं एवढीच चर्चा झाली की, या परिस्थीवर काहीतरी कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे. तातडीची मदत तर तत्काळ दिलीच पाहिजे पण अशा घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना त्यावर काय होऊ शकेल? हा प्रयत्न केला गेला पाहिजे. तसेच, मी त्यांना सांगतिलं की त्यांनी जर बैठक बोलावली तर आम्ही यायला तयार आहोत.”

तसेच, मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही आश्वासन दिलं का? असं फडणवीसांना विचारण्यात आले असता त्यांनी, एवढ्या कमी चर्चेत काही आश्वासन वैगरे होऊ शकत नाही, मी पत्रकारपरिषदेत बोलतो. असंही यावेळी सांगितलं.

तर, यावेळी शिवसैनिकांकडून ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप दिल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहुपुरीतच थांबलो होतो , असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. या वेळी फडणवीसांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती.

यानंतर स्थानिकांच्या समस्य़ा ऐकून त्यांच्याशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, नुकत्याच आलेल्या पुरामुळे या ठिकाणी जे पाणी आलं आणि आताच आम्ही त्याचं निरीक्षण केल्यानंतर,  किती अतोनात नुकसाना झालं आहे, हे दिसून आलं. त्यामुळे या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks