मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी,शिरोळ मधील पुर बाधित भागाची पाहणी करून नागरिकांशी साधला संवाद.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज कोल्हापुरातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी व तसेच शिरोळ मधील पूर बाधित भागाची पाहणी करून स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला.
शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय येथील निवारा केंद्रातील पुरबाधित कुटूंबाची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. यावेळी, कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिली.
यावेळी, पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खा .संजय मंडलिक, खा.धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, राजेश क्षीरसागर, गणपतराव पाटील, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, गोकुळ संचालक डॉ. सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावर, मनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.