ताज्या बातम्या
नागरदळे येथील एकनाथ हदगल याना मुंबई रत्न पुरस्कार

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नागरदळे तालुका चंदगड येथील सुपुत्र एकनाथ तुकाराम हदगल (मुंबईस्थित युवा उद्योजक) यांना कोविड १९ जागतिक महामारी मध्ये मोलाची कामगीरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे *”मुंबई रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
एकनाथ हदगल यांचे कार्य अभिमानास्पद आहे. “एक हाती मदत” या उपक्रमात त्यांनी सिंहाचा वाटा उचलून आपल्या मुंबईतील लोकांना सहकार्य केले याची दखल राज्यपालांनी घेणे फार मोठे कौतुकास्पद आहे. आमच्या नागरदळे गावचे नाव आणखीन मोठे करून मानाचा तुरा रोवल्याबद्दल तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.