ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कसबा वाळवे परिसरातील पशुवैद्यकीय सेवकांचे बेमुदत आंदोलन

कसबा वाळवे :
पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवीधारकांकडून याच क्षेत्रातील पदवीधारकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी कसबा वाळवे परिसरातील पशुवैद्यकीय सेवकांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. १५ जुलैपासून शासकीय पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामध्ये पशुवैद्यक सोमवार १९ पासून सहभागी झाले आहेत. त्यामुळे पशुवैद्यक उपचार बंद पडल्याने पशुपालक व शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये पशुवैद्यक डॉ. विजय कोकाटे, डॉ. जालिंदर कांबळे, डॉ. विष्णू पाटील, डॉ. नेताजी फराक्टे, डॉ. सतिश पाटील, डॉ. उदय पाटील, डॉ. प्रसाद खोत आदींचा सहभाग आहे.