ताज्या बातम्या
नगरपालिका स्वछता कर्मचारी दिलीप लक्ष्मण वाघेला यांना श्रमगौरव पुरस्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
काॅम्रेड अनंत बारदेस्कर यांच्या २४व्या स्मृतिदिनानिमित्त मुरगुड नगरपालिका स्वच्छता कर्मचारी दिलीप लक्ष्मण वाघेला यांना श्रमगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रोख रुपये पाच हजार आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार त्याना दलीत मित्र डी.डी.चौगले यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी दिलीप वाघेला यानी कोरोणा काळात बेधडक पणे जी स्वच्छता मोहीम राबवली,याचे बद्दल त्याचे कौतुक डी.डी.चौगले यानी आपल्या भाषणात केले .
दिलीप वाघेला यांचे वडील लक्ष्मण वाघेला सुद्धा मुरगुड नगरपरिषदेत स्वच्छता कर्मचारी होते. या वेळी समाजवादी प्रबोधिनीचे बी. एस. खामकर,बबन बारदेस्कर , तानाजी कांबळे,बंडा कांबळे,रणजित कदम , भिकाजी कांबळे,मोहन कांबळे,विष्णू कांबळे इत्यादी उपस्थित होते.