बीडशेड येथे करवीर तालुका युवक कॉंगेस ची इंधन दरवाढ विरोधी सह्यांची मोहिम

सावरवाडी प्रतिनिधी :
केंद्र शासनाने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ करून सामान्य जनतेचे जीवन उद्वस्त केले . वाढत्या महागाईच्या काळात भाजप सरकारने इंधन दरवाढ केली त्यांचा निषेध करण्यात आला . करवीर तालुक्यातील बीडशेड येथे पेट्रोलपंपावर इंधन दरवाढ रद्द करावी या मागणी साठी करवीर तालुका युवक कॉग्रेस या संघटनेतर्फ आज शनिवारी सह्यांची मोहिम राबविण्यात आली.
सकाळी अकरा वाजता युवक कॉग्रेसचे कार्यकर्त पेट्रोल पंपाजवळ जमले होते . हातात झेंडे घेऊन कार्यकत्यांनी घोषणाबाजी केले प्रत्येक दिवशी इंधरदरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला .पेट्रोल , डिझेल गॅस दरवाढ रद्द करा तीन कृषि विरोधी कायदे रद्द करा , आदिघोषणा कार्यकर्त देत होते . युवक कॉग्रेस संघटनेतर्फ राज्यभरात सह्यांची मोहिम राबवून राष्ट्रपतीना पाठविण्यात येणार आहे.
कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यात आले होते . यावेळी युवक कॉग्रेसचे नेते डॉ लखन भोगम, गोकूळ दुध संघाचे माजी संचालक सत्यजीत पाटील, जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सुर्यवंशी , कॉग्रेस नेते योगेश कांबळे आदिची भाषणे झाली.
या वेळी दिनकर गावडे, स्वरूप पाटील, योगेश कांबळे , ऋतुराज संकपाळ तानाजी जाधव , हिंदूराव तिबीले, सचीन पाटील, इंद्रजीत पाटील धोडीराम जाधव , पंडीत कुंभार, संजय लोंढे, नामदेव माने यांच्यासहीत युवक कार्यकर्त उपस्थितीत होते.