जीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

कोरोना महामारीत बिद्रीचा ऑक्सीजन प्रकल्प सहकाराला दिशादर्शक; प्रकल्प भेटीवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे गौरवोद्गार

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके

कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्य सध्या कोरोनाचा मुकाबला नेटाने करीत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत बिद्री साखर कारखान्याने ऑक्सीजन प्रकल्प उभारुन सहकाराला दिशा दिली आहे. व सामाजिक बांधिलकीबरोबरच समाजाचे उत्तरदायीत्वही जपले आहे. असे गौरवोदगार राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज जिल्हा दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी बिद्री साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सीजन प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, बिद्री साखर कारखाना साखर उतारा, एफआरपी देण्यात कायम आघाडीवर राहिला आहे. ज्याप्रमाणे सहवीज प्रकल्पातून उत्पन्न सुरु ठेवले त्याच पध्दतीने आता कारखान्याने इथेनाँल निर्मितीला प्राधान्य दिले पाहीजे. कोरोनाच्या दोन्ही लाटा आपण परतवून लावल्या, तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे.

यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील म्हणाले, आरोग्य मंत्री राजेश टोपेंच्या मार्गदर्शनाखाली राज्य कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. राज्य शासनाने मोठ्या ऑक्सीजन प्रकल्पांना अनुदान देण्याचे धोरण जाहिर केले आहे. त्याचप्रमाणे बिद्री सारख्या लहान प्रकल्पांनाही शासनाने अनुदान देण्याची भुमिका घ्यावी.

यावेळी कारखाना संचालक प्रविणसिंह पाटील, धनाजीराव देसाई, प्रविण भोसले, के. ना. पाटील, उमेश भोईटे, राजेंद्र पाटील, श्रीपती पाटील, युवराज वारके, एकनाथ पाटील,  विकास पाटील – कुरुकलीकर, अशोक कांबळे, आजऱ्याचे सभापती उदय पवार, मुकुंद देसाई, आर. वाय. पाटील, भिमराव केसरकर, शिवाजी केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी मानले.
चौकट

बिद्री ‘ रोल मॉडेल ‘

कोरोना महामारीत ऑक्सीजन अभावी अनेकांनी जीव गमावला, याचे गांभिर्य ओळखून शासनाने ऑक्सीजन निर्मितीला प्रोत्साहन दिले. राज्यातील गंभिर परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपत बिद्री साखर कारखान्याने या प्रकल्पाची काटकसरीने, तात्काळ उभारणी केली आहे.  या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऑक्सीजनमुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव वाचणार असून हा प्रकल्प राज्यातील अन्य साखर कारखाने व सहकारी संस्थांसमोर ‘ रोल मॉडेल ‘ ठरेल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks