संजय पाटील उत्कृष्ठ सभासद पुरस्काराने सन्मानित

गारगोटी प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोशिएशन तफै देण्यात येणारा सन २०-२१ चा उत्कृष्ठ सभासद पुरस्कार गारगोटी ता. भुदरगड येथील लक्ष्मी मेडिकल चे मालक संजय रघुनाथ पाटील यांना देवून सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य केमीस्ट असोशिएनचे संघटन सचिव मदन पाटील यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ, व सन्मानचिन्ह देवून संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
संजय पाटील यांचे गारगोटी येथे गेली ३० वर्षे औषध दुकान असून औषध कंपन्या, डॉक्टर्स, रुग्ण यांच्यामध्ये चांगला समन्वय ठेवून संघटनेच्या नियमाप्रमाणे चांगले कार्य केले त्यामुळेच त्यांची उत्कृष्ठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे मदन पाटील म्हणाले.
या कार्यक्रमास जिल्हा केमिस्ट असोशिएनचे अध्यक्ष संजय शेटे, पश्चिम विभागीय उपाध्यक्ष रविंद्र पाटील, सचिव शिवाजीराव ढेंगे, प्रल्हाद खवरे, भरतेश कळञे, कुमार बोरगांवे, सचिन पुरोहीत, भुजंग भांडवले, शशिकांत खोत, रत्नाकर देसाई यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते.