मुरगूड मध्ये वीर शिवा काशिद यांची ३६१ वी पुण्यतिथी साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
नेपापुरच्या वीर शिवा काशिद यांनी स्वराज्य रक्षणार्थ दिलेले बलिदान इतिहास कधीच विसरणार नाही असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले . ते वीरशिवा काशिद पुण्यतीथी कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
येथील वीर शिवा काशिद सांस्कृतिक भवनात उपनगराध्यक्षा सौ. रेखा मांगले यांचे हस्ते स्वराज्य रक्षक वीर शिवा काशीद यांचे प्रतिमेचे पुजन करणेत आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके होते.
नगरसेवक सुहास खराडे , एम.डी. कांबळे , नगरसेविका सुप्रिया भाट मुरगूडचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नामदेवराव मेंडके , सुनिल रनवरे ,विनोद रनवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास शहर अध्यक्ष प्रवीण रणवरे , बाजीराव रणवरे ‘ सचिन रणवरे ,अनिल रणवरे ,रामचंद्र शिंत्रे , जयवंत गोधडे, संजय रणवरे , जोतीराम रणवरे , किशोर रनवरे , नंदू रणवरे, संदीप रणवरे,विलास रणवरे, सचिन कोरे, जोतीराम पवार , सचीन रनवरे, ऋशन रनवरे , विजय माने ,सविता माने, श्रावणी शिंत्रे आदीसह नागरीक उपस्थित होते.
स्वागत सुनिल रनवरे , प्रास्ताविक विनोद रनवरे तर आभार संतोष रनवरे यांनी मानले.