ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पोलिस, आर्मी व सरळसेवा भरती तात्काळ सुरू करावी यासाठी चळवळ; एक लाख विद्यार्थ्यांच्या सह्यांच्या मोहीमेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद संकल्पक योगेश पाटील सर यांचा अभिनव उपक्रम.

कोल्हापूर :
शासनाची उदासीनता,कोरोनाची महामारी यामुळे गेले 2 वर्ष रखडलेली भरतीप्रक्रिया, यामुळे विद्यार्थ्यांचं होणार नुकसान,जुन्या नियुक्त्या, काही वयामुळे बाहेर निघणारे विद्यार्थी, त्यांच्या करिअर च्या होणाऱ्या अंधुक वाटा लक्षात घेऊन,या अन्यायाला वाचा फोडून विद्यार्थांना न्याय देण्याच्या भूमिकेतून नवे आणि अभिनव आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनास विद्यार्थी,युवा वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, तसेच समाजाच्या प्रत्येक स्तरातून या मोहिमेला बळ प्राप्त होत आहे. लवकरच संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री,गृहमंत्री, यांना निवेदन देऊन शासनाला धडक देण्यासाठी अभिनव चळवळ सज्ज आहे.या अनोख्या चळवळीमुळे अभिनव करिअर अकादमी कोनवडे ता.भुदरगड चे संस्थापक आणि या आंदोलनाचे संकल्पक योगेश पाटील सर तसेच या अभिनव चळवळीचे चे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.