जीवनमंत्रताज्या बातम्यासामाजिक

16 जुलै रोजी “रस्याव” चे प्रकाशन आडी येथील परमाब्धिकारांचा आणखीन एक ग्रंथ वाचकांच्या भेटीस

कोगनोळी :

परमाब्धि, सत्पोष, महोन्नय, वर्तेट या ग्रंथांच्या परमार्थिक कल्याणाच्या योगदानानंतर परमपूज्य परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांनी “रस्याव” या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथाचे प्रकाशन भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांवर हा ग्रंथ समर्पित करून आश्रमस्थांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 16 जुलै 2021 रोजी होणार आहे.

मनुष्याच्या विचारातील वागण्यातील काही बाबी त्या व्यक्तीची, परिवाराची तसेच इतर संबंधितांची मोठी हानी करण्यास कारणीभूत ठरतात. ही हानी टाळण्यासाठी अशा हानिकारक बाबींचे निराकरण करण्याचे अतिशय महत्त्वाचे मुद्दे या ग्रंथामध्ये सोप्या भाषेतून सांगण्यात आले आहेत. “रस्याव” या ग्रंथ नामाचे विविध अर्थ ग्रंथामध्ये दिलेले आहेत.

ग्रंथाचे प्रकाशन फक्त आश्रमस्थांच्या उपस्थितीतच होणार आहे. ज्यांना ग्रंथ घ्यावयाचा आहे त्यांच्या गावी तो पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या ग्रंथाचे व्यावहारिक मूल्य 425 इतके असले तरी भाविकांना तो 350 या सवलतीच्या किमतीत प्राप्त होईल, असे हार्दायन मठ, आडी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks