ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

कोविड च्या महामारीला रोखण्यासाठी बिद्री साखर कारखान्याचा ऑक्सीजन प्लँट प्रत्यक्षात कार्यान्वीत; चेअरमन मा.आमदार के.पी.पाटील यांच्या कृतीशील धोरणाने प्रकल्प सुरु.

कोल्हापूर :

देशात,राज्यात कोरोनाचा संसर्ग वर्षाहून आधिक काळ संक्रमनशील आहे. प्रामूख्याने बाधित रुग्णास ऑक्सीजन हा घटक या आजरात महत्वाचा ठरला आहे. ऑक्सीजनशिवाय अनेकाचे बळी गेले आहेत. कोल्हापूर जिल्हयात ऑक्सीजनची गरज ओळखून देशाचे नेते खा. शरदचंद्र पवार यांनी केलेले अवाहान हा एक कर्तव्याचा भाग म्हणून बिद्री साखर कारखान्याचे वतीने मा.के पी.पाटील यांनी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची उभारणीची घोषणा करुन हा निर्णय पूर्णत्वास नेला. सह.साखर कारखान दारीत असा प्रकल्प उभा करणारा बिद्री हा पहिला साखर कारखाना आहे.

प्रकल्पाचे तंत्रज्ञान एअर संप्रेशन युनिटच्या सहाय्याने नैसर्गिक हवेतून नायट्रोजन गॅस स्वच्छ स्वतंत्र करुन शुद्ध ऑक्सीजनची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे. उत्पादन क्षमता २५ एनएम असून सिंलेडर फिलिंग क्षमता ८०- ९० सिंलेडर १२ किलो प्रति ग्रॅम प्रति सिलेंडर प्रतिदिन तयार होणार आहे. तर यामधील ऑक्सीजन प्यूरीटी ९३% इतकी स्वच्छ असणार आहे. ऑक्सीजन आउटलेट प्रेशर ०-५ बार इतके आहे.

प्रकल्पाची मुळ किमंत ५० लाख रु. इतकी असून मे साई नॉन कन्वेशनल एनर्जी, नाशिक. या दर्जेदार कंपनीने हा प्रकल्प उभा केला आहे. प्रकल्पाचे मार्गदर्शक महा.राज्य सह.साखर संघ मुंबई तर तांत्रिक सल्लागार वसंतदादा शुगर इस्टीटयूट मांजरी पूणे हे असुन हा प्रकल्प कारखाना कार्यक्षेत्रातील वैद्यकीय घटकासह अन्य उद्योगांना चालना देणार ठरेल.

एकूणच बिद्रीचे चेअरमन मा.आमदार के.पी. पाटील यांनी आपल्या कुशल नेतृत्वातून समाजावर आलेले कारोनाचं संकट यावर एक कर्तव्याचा भाग म्हणून बिद्री साखरेच्या माध्यमातून उभा केलेला ऑक्सीजन निर्मित्ति प्रकल्प सर्वाना तारक ठरेलच. पण साखर उद्योगाच्या सहकारात के.पी.पाटील यांची कार्यकुशलता सिद्ध झाल्याशिवाय रहात नाही एवढ मात्र खरं.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks