मुरगूडात दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करा; सानिका स्पोर्टस् फौडेंशनची खास. मंडलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड व परिसरातील नागरीकांचा वेळ, पैसा व नाहक त्रास कमी व्हावा म्हणून मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५७ गाव करीता कागल येथे असलेले दिवाणी व फौजदारी न्यायालय नागरीकांच्या सोयी करीता मुरगूड शहरामध्ये सुरू करण्यात यावे. अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे येथील सानिका स्पोर्टस् फौडेंशनच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
कागल तालुक्यामध्ये एकुण ८४ गांवे आहेत . त्यातील ५७ गावे मुरगूड पोलीस ठाण्याच्या तर ३७ गावे कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतात.कागल पोलीस ठाणे व मुरगूड पोलीस ठाण्याकरीता कागल येथे दोन वेगवेगळी दिवाणी व फौजदारी न्यायालय आहेत . मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५७ गावा करीता कागल शहरामध्ये वेगळे न्यायालय आहे . या ५७ गावातील नागरीकांना दिवाणी व फौजदारी न्यायालयीन कामकाजासाठी कागल येथे जावे लागते .
कागल शहर मुरगूड शहरापासुन ३० कि.मी. अंतरावर आहे . तसेच अन्य गावा पासुन ६० ते ७० कि.मी अंतरावर आहे .त्यामुळे नागरीकांना कोर्ट कामा करीता कागल शहरामध्ये येण्या जाण्या करीता वेळ, पैसा व नाहक त्रास सहन करावा लागत आहे . यासाठी मुरगूड पोलीस ठाणे हद्दीतील ५७ गाव करीता कागल येथे असलेले दिवाणी व फौजदारी न्यायालय नागरीकांच्या सोयी करीता मुरगूड शहरामध्ये सुरू करावे . अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .
या मागणीचे निवेदन खास . मंडलिक यांना देताना सानिका स्पोर्टस फौडेशनचे संस्थापक , माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, चिमगावचे उपसरपंच अनिल आंगज , निवास कदम, राजू चव्हाण, विकी बोरगावे, , सागर सापळे, नंदकिशोर खराडे, तुषार साळुखे, सुशा॑त मागोरे, विनायक मुसळे, ऋतुराज शिंदे ,सुरज मुसळे, ओंकार म्हेतर,अरविंद मोरबाळे आदी. उपस्थित होते.