छोट्या शिवश्री चे केले जल्लोषी स्वागत; बरगेवाडी येथील पांडुरंग बरगे यांचा कौतुकास्पद उपक्रम

कौलव प्रतिनिधी :
समाजामध्ये आपण पाहतो की वंशाचा दिवा म्हणून मुलग्याचा नेहमी हट्ट धरला जातो आणि मुलींच्या भ्रूणहत्याचे प्रमाण वाढले आणि मुलींचे प्रमाण कमी झाले. मुलग्याचे लहानपणापासूनच लाड केले जातात आज समाजामध्ये मुलगा हवा ही मानसिकता झाली आहे पण या सर्व गोष्टींना कलाटणी देऊन आपली कन्या शिवश्री हिचे दारामध्ये भव्य अशी रांगोळी घालून घरामध्ये विविध प्रकारची फुले पांघरून स्वागत केले आहे हा उपक्रम राबवला आहे बरगेवाडी ता राधानगरी येथील प्रसिध्द फोटोग्राफर पांडुरंग केरबा बरगे यांनी मुलग्या पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी या वाक्याचा अर्थ फक्त बोलण्याकरता नवे कृतीत करून दाखवला आहे समाजामध्ये सर्वांनी मुलग्या बरोबर मुलींचाही आदर केला पाहिजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मुलगीचा आदर राखला पाहिजे.
या शुभ प्रसंगी केरबा बरगे, तानुबाई बरगे,एस के बर्गे सर ,लता बुगडे ,उज्वला बुगडे, हिंदुराव मालप, साताबाई मालप ,सुभाष बरगे,शुभांगी बरगे उपस्थित होते.