ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भाजप कागल तालुका सरचिटणीसपदी मयुर सावर्डेकर यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर जगदीश सावर्डेकर यांची भारतीय जनता पार्टी कागल तालुका सरचिटणीसपदी निवड झाली आहे .
भाजपचे नेते अंबरिषदादा घाटगे यांच्या हस्ते मयुर सावर्डेकर यांना सरचिटणीस पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले . यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील , जिल्हा चिटणीस तानाजी अण्णा कुरणे, मंडल अध्यक्ष एकनाथ पाटील व अमर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ, खा.धनंजय महाडिक, माजी आम. सुरेश हाळवणकर, माजी आम. संजयबाबा घाटगे, गोकूळचे संचालक अंबरिषदादा घाटगे,जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या मान्यतेने मयूर सावर्डेकर यांची ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.