लोकशाहीच्या बळकटीसाठी सक्रिय लोक सहभागाची गरज : प्राचार्य डॉ. टी. एम.पाटील

निकाल न्युज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लोकशाहीच्या बळकटीसाठी सक्रिय लोकसहभाची गरज आहे. लोकांनी लोकशाहीचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे, न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले .ते गगनबावडा येथील पद्मश्री डॉ.ग.गो. जाधव महाविद्यालयात आयोजित केलेल्या “जागतिक लोकशाही दिन” या विषयावरील भितीपत्रकाच्या अनावरणप्रसंगी बोलत होते.
राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमात त्यांनी ,प्राचीन अथेन्स आणि स्पार्टा राज्यातील प्रत्यक्ष लोकशाही ,अमेरिकेतील अध्यक्षीय लोकशाही, इंग्लंड आणि भारतातील संसदी लोकशाही व्यवस्था संदर्भात सखोल मार्गदर्शन केले .लोकशाही व्यवस्थेत अभिव्यक्तीला विशेष महत्त्व असून लोकांनी सुजानतेने आपली मते नोंदवावीत असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष प्रा. सतीश देसाई व सचिव प्रा विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. ए.सी. कुंभार यांनी केले तर आभार प्रा .ऐश्वर्या धामोडकर यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.