ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य विभाग अर्जुनवाडा यांचेकडून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान अंतर्गत नंदयाळ येथे आरोग्य शिबीर व आरोग्य विषयक जनजागृती संपन्न

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आरोग्य उपकेंद्र अर्जुनवाडा यांचे वतीने ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत बुधवार दि.१७ रोजी मनिषा कांबळे सरपंच वहिनी, नंदयाळ ग्रामपंचायत, दत्तात्रय कांबळे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, संग्राम संकपाळ ग्रामपंचायत अधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी व सर्व कर्मचारी व नागरिक यांच्या उपस्थित मध्ये सदर अभियानाचे शुभारंभ करणेत आला.

यावेळी ७५ महिलांची आरोग्य तपासणी करून ३४ महिलांचे एक्स-रे , ४१ ईसीजी , ३५ महिलांचे लॅब टेस्ट करुन शुगर व बीपी तपासणी करुन विविध आरोग्य विषयक जनजागृती करणेत आली यामध्ये डेंगू मलेरिया हे किटकजन्य व अतिसार, कावीळ हे जलजन्य आजार / टीबी फ्री इंडिया व टी बी मुक्त ग्रामपंचायत अभियान / कुष्ठरोग / मुलगी शिकली पाहिजे / बेटी पढाओ बेटी बचाओ / स्रीभ्रणहत्या /लहान बालके व गरोदर माता यांचे विविध लसीकरण व तातडीच्य आरोग्य सेवेसाठी १०८ मोफत रुग्णवाहीका व इतर आरोग्य विषयक माहितीचे फलक द्वारे जनजागृती करणेत आली.

यावेळी डॉ.महेश कुराडे, डॉ. चंद्रकांत परकाळे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद धामणकर , आरोग्य सेवक महेश जाधव,आरोग्य सेविका कांचन गुरव, आरोग्य निरीक्षक जयसिंग खोत, उपकेंद्र कापशी गौरी खैरमोडे ,आरोग्य विभाग पंंचायत समिती कागल, कविता पाटील, शोभा ढेंगे आशा सेविका वैशाली सुतार अर्जुनवाडा, राऊत वाहन चालक व विविध संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks