ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल तालुक्यातील कुरणी येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू ; कडबाकुट्टी मशिन सुरू करताना दुर्घटना

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील कुरणी येथे कडबाकुट्टी मशिन सुरू करताना विजेच्या धक्याने महिलेचा मृत्यू झाला.सुनिता कृष्णात मांगोरे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे याबाबतची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कुरणी येथील सुनिता कृष्णात मांगोरे या आपल्या जनावरांच्या शेडमध्ये जनावरांना वैरणीची कुटी करीत असताना चारा कुटी मशिनचा शॉक बसून बेशुध्द अवस्थेत मिळून आल्या. त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे आणून तेथील डॉक्टर यांनी त्यांना तपासले असता, डॉक्टरांनी उपचारापुर्वीच मयत झालेचे सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची फिर्याद रविंद्र रामचंद्र मांगोरे यांनी मुरगूड पोलिसात दिली असून घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. अधिक तपास हेड.कॉ. सचिन पारखे करीत आहेत.