मुरगुड विद्यालयाच्या मुलांच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
एकोंडी तालुका कागल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 14 वर्षाखाली मुलांचा कबड्डीचा सघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघामध्ये मनोज भोसले, रणवीर कांबळे , जय शिंदे, केदार पाटील, सार्थक कांबळे, अभिमन्यू पवार, प्रथमेश गोरूले, प्रमोद हसूरकर, प्रेमराज कापडे , रणवीर बैलकर, समीर देसाई, सार्थक भारमल या खेळाडूंचा तर 14 वर्षे वयोगटाखाली मुलांच्या कबड्डी संघामध्ये
समर्थ कुंभार, संभव खराडे, राजवर्धन शिंदे, व्यंकटेश सुतार, अथर्व कांबळे, प्रणव वाघराळे, वीरधवल खराडे , संभव केसरकर, उन्मेश चव्हाण, अंश जाधव,मेघराज भारमल, व्यंकटेश पाटील सहभाग होता.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई अध्यक्षा शिवानी ताई देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई युवा नेते दौलतराव देसाई प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस पी पाटील, उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, उपप्राचार्य व्ही जी घोरपडे, पर्यवेक्षक एस डी साठे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी लोकरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक संभाजी कळंत्रे, अनिल पाटील, महादेव खराडे, श्यामली डेळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.