ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लंडन हाऊसच्या भेटीमुळे कृतार्थ झालो : मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना ; मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह केडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी राहिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने लंडन हाऊस ही वास्तू पुनीतपावन झालेली आहे. लंडन हाऊसला भेट हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. या वास्तूला भेट देऊन कृतार्थ झालो, अशी भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळांने लंडनमध्ये लंडन हाऊसला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ज्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूलमध्ये शिकायला होते त्यावेळी ते या घरांमध्ये वास्तव्यासाठी होते. त्यांच्या वास्तव्याने ही वास्तू पुनीत पावन झालेली आहे. या वास्तूला भेट देताना आम्हा सर्वांनाच मनापासून आनंद होत आहे. ज्यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पदवी प्राप्त केली परंतु; पुढचं शिक्षण घेणं अशक्य होतं. एका गरीब कुटुंबात जन्मलेला व्यक्ती पदवीधर होऊ शकतो हे ऐकून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना फार मोठा आनंद झाला होता. त्यांनी मुंबईमध्ये जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि पुढील शिक्षणासाठी आपण व्यवस्था करू असे सांगितले. आपण दलित समाजातील एकमेव अशी व्यक्ती आहात की, जे तुम्ही देशासाठी चांगले काम करू शकाल. त्यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केले. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लंडनला आले आणि त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व “बार ॲट लाॅ” ही पदवी घेतली. त्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मानही केला.

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, त्याचवेळी ऐतिहासिक अशी माणगाव समता परिषद झाली होती. या सभेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी भाषण केले होते की, मी जरी राजा असलो तरी तुम्हा समस्त बहिष्कृत समाजाचा नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर होतील. ते आपले आणि आपल्या देशाचे नाव उज्वल करतील. त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालेले नव्हते. अर्थातच; भारतीय राज्यघटनाही लिहिलेली नव्हती. अशा परिस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा द्रष्टेपणा आणि ही व्यक्ती काय करू शकते हे ओळखलं होतं, हे खरोखरच आश्चर्यजनक आहे. अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर या भूमीतून येथे येत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. लंडनमध्ये ज्या घरात राहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले आणि भारतीय राज्यघटना लिहिली त्या वास्तूला भेट देणे, हा आमच्या जीवनातील अमूल्य असा दिवस आहे. त्यामुळे याच्यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही. या ठिकाणी मी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अंतकरणापासून अभिवादन करतो आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो.

यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, राजेश पाटील, माजी संचालक असिफ फरास, युवराज गवळी, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks