कागल तालुका शासकीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात ; 35 मल्लांची जिल्हास्तरीय निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज व लाल आखाडा व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या शासकीय कुस्ती स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला.चौदा वर्षाखालील मुले व मुली आणि ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत 35 मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व नामदेवराव मेंडके यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाट्न झाले.
विद्यालयाचे प्राचार्य एस पी पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक मधुन भविष्यात जर आपल्यावर जिल्हास्तरीय किंवा विभागीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजन दिले तरी शाळा व लाल आखाडा व्यायाम मंडळाच्या वतीने या स्पर्धा पार चांगल्या पद्धतीने पार पाडू असे आश्वासन दिले.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी आपण आता पर्यंत मुरगूड मध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे भरविल्या आहेत.पारदर्शक स्पर्धा पार पडणे हे महत्वाचे आहे.नवीन मल्ल निर्माण होताना त्यांना सर्व नियम आणि निकोप स्पर्धा समजणे गरजेचे आहे त्यामुळे शासकीय कुस्ती स्पर्धाचे आयोजन चांगल्या होण्यासाठी आपण नेहमी आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी प्रवीणसिंह पाटील,नामदेवराव मेंडके व दगडू शेणवी यांच्या हस्ते मॅट पूजन करून कुस्तीला प्रारंभ झाला.नामदेवराव मेंडके, दगडू शेणवी, दिग्विजय पाटील,उपमुख्याद्यापक संजय सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस डी साठे,आनंदराव कल्याणकर, शिवाजी सातवेकर,कागल तालुका संघटना अध्यक्ष महेश शेडबाळे,आनंद लोखंडे,मारुती मेंडके,जगन्नाथ पुजारी, संजय मोरबाळे, दादा चौगले, आकाश पाटील, पांडुरंग मगदूम,आदी प्रमुख उपस्थित होते.महादेव खराडे, एस एस कळत्रे, शामली डेळेकर,संपत कोळी,पांडुरंग पूजारी,राजू चव्हाण,शिवाजी मोरबाळे, गणेश तोडकर, रोहित मोरबाळे, समाधान बोते,अजित कांबळे आदिनी स्पर्धा संयोजन केले.आभार अनिल पाटील यांनी मानले.
स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे :
14 वर्षाखालील मुले फ्री स्टाईल – 35 किलो शिवरुद्र चौगुले, एकोंडी रुद्राक्ष तळेकर, सावर्डे 38 किलो यश खोंदरे,एकोंडी अमित सातपुते,मुरगुड 41 किलो अथर्व मोहिते,मुरगुड पृथ्वी शितोळे,करनुर 44 किलो राजवीर तिळवणे, बानगे कार्तिक गुरव,कागल 25 किलो अनुप कांबळे सिद्धनेर्ली, 52 किलो वेदांत निकम,कुरुकली नवनाथ मगदूम,बानगे 57 किलो नहीम पटेल,बानगे आयुष पवार,शेंडुर 68 किलो सार्थक ताटे, बाणगे
14 वर्षाखालील मुली-30 किलो मधुरा हंडे,सांगाव प्राजक्ता पाटील, मुरगुड 33 किलो सुकन्या मोरबाळे मुरगुड आराध्या कोळी,कागल 36 किलो अन्विता कांबळे कागल श्रुती बोडके वाळवे 39 किलो आदिती ढेरे,मुरगुड 42 किलो ईश्वरी हजारे सिद्धनेर्ली, भक्ती पाटील कागल 46 किलो आराध्या पाटील वाळवे 50 किलो प्रणाली जाधव मुरगुड 54 किलो जानवी मोरे मुरगुड 58 किलो स्वरांजली फडके कागल 62 किलो जानवी पांडव मुरगुड
19 वर्षाखालील ग्रीको रोमन मुले-55 किलो विश्वजीत चौगुले कागल जय पवार बेलवळे साठ किलो ऋषिकेश डेळेकर मुरगुड 63 किलो अमित देसाई बेलवडे 67 किलो अथर्वतोरसे बिद्री बहात्तर किलो हर्षवर्धन पाटील बेलवडे हर्षवर्धन शितोळे मुरगुड