अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत अत्याचाराचा प्रयत्न ; मुरगूड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील एका शाळेत शिपाई असणाऱ्या श्रेयस ज्ञानेश्वर डवरी (वय २७ रा. सेनापती कापशी) याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुलीने केलेल्या तक्रारीवरून मुरगूड पोलीस ठाण्यात श्रेयश डवरीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कापशीतील श्रेयश डवरी हा एका शाळेत शिपाई पदावर सेवेत आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच तिला धमकी देवुन मोबाईलमध्ये आपल्याबरोबरचे मुलीचे फोटो काढले. ही बाब कोणाला सांगीतल्यास मुलगी व तीच्या आईला जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. तसेच पीडित मुलीशी वारंवार मोबाईलद्वारे संपर्क केला.
याबाबत सदरी पीडित मुलींने मुरगूड पोलिसात श्रेयस डवरीच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी श्रेयस डवरीला अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे करीत आहेत.