जनसुरक्षा विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावे : शिवसेना ठाकरे गटाची गडहिंग्लज प्रांत कार्यालसमोर निदर्शने

गडहिंग्लज प्रतिनिधी : राजेंद्र यादव
गडहिंग्लज शहर ठाकरे गटाचे वतीने जिल्हाप्रमुख प्रा सुनिल शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारने अलीकडेच काही महिन्यांपूर्वी मंजूर करून घेतलेल्या जनसुरक्षा विधेयक कायद्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील महायुती सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर करून लोकशाहीचा आवाज दाबलेला आहे.राज्यातील जनसुरक्षा विधेयक कायदा हा व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. या विधेयक मुळे शासन कोणत्याही व्यक्तीवर आरोप लादून त्याच्यावर अटकेची कारवाई करू शकते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतुन अधिकार व हक्क पायदळी तुडविले जात आहेत.
आपल्या म्हणण्याप्रमाणे हा कायदा चा वापर करून विरोधकांना भीती घालण्यासाठी केला जाणार आहे .त्यामुळे या कायद्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीव्र जनमानसात असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने हे विधेयक तात्काळ रद्द करावे , अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी सह संपर्क प्रमुख रियाजभाई शमनजी, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील,चंदगड विधानसभा क्षेत्र राजू रेडेकर,तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत,युवराज पोवार,युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख अवधूत पाटील,जिल्हा महिला संघटिका शांता जाधव,उप तालुका प्रमुख वसंत नाईक, शहर प्रमुख प्रकाश रावळ,मारुती जाधव , सुधाकर जगताप, श्री शैल्लपा साखरे, सुरेश हेब्बाळे, संजय पाटील सागर हेब्बाळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.