ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आदमापूर येथील बाळूमामा मंदिर शनिवारपासून चार दिवस बंद ; नवरात्रोत्सवच तयारीसाठी दर्शनासह भक्त निवासही बंद

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू श्री बाळूमामा मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंदिर, शिखर आणि मंदिर परिसर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी चार दिवस मंदिर दर्शन, अन्नछत्र व भक्त निवास बंद राहणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी दिली.
शारदीय नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर, शिखर, मंदिर परिसर तसेच भक्त निवास यांची स्वच्छता हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या शनिवार (ता. १३) पासून मंगळवार (ता. १६) पर्यंत देवदर्शन बंद राहणार आहे. तसेच अन्नछत्र व भक्त निवासही बंद राहणार आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांनी या कालावधीत दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे.