गारगोटी मध्ये नंदादीप नेत्रालय शाखेचा शुभारंभ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
45 वर्षाच्या नेत्रसेवेची यशस्वी वाटचाल घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय आता कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी शहरात देखील दाखल झालेले आहे.
शहरांप्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रत्येकाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसामान्यांना परवडतील असे डोळ्याच्या सर्व आजारावर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी गारगोटी मधील शाखेचा शुभारंभ बस स्टॅंड जवळील, साई मंदिरा समोर, हिंदतारा कॉम्प्लेक्स मधे करण्यात आला.
या शाखेचे शुभारंभ गारगोटीतील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक हिंदुराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी श्री. देसाई यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. तसेच नंदादीप नेत्रालयचे मुख्य व्यवस्थापक विठ्ठल चव्हाण आणि मार्केटिंग प्रमुख जावेद बिजापुरे समवेत गारगोटीतील प्रतिष्ठित मंडळी आणि संपूर्ण नंदादीप स्टाफ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या निमित्ताने गारगोटीकरांना संपूर्ण महिनाभर मोफत नेत्रातपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, तसेच वेगवेगळ्या शासकीय आणि कॅशलेस योजनेतून मोफत शास्त्रक्रियेच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन नंदादीप नेत्रालयच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले.