ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड परिसरातील तेरा मंडळांवर गुन्हा नोंद ; मुरगूड पोलिसांची धडक कारवाई

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहर आणि परिसरातील सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये गणेश आगमन मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टीम लावून ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या तेरा मंडळांवर मुरगूड पोलीस स्टेशन कडून धडक कारवाई करण्यात आली आहे.
साऊंड सिस्टीम लावून ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिले होते. त्यानुसार मुरगूड शहर आणि परिसरातील मंडळांची बैठक घेऊन याबाबत आवाहन करण्यात आले होते.
परंतु काही मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टीम लावून आवाजाची मर्यादा ओलांडल्याने मुरगूड पोलिसांनी तेरा सार्वजनिक मंडळांवर ध्वनी मर्यादा ओलांडल्यामुळे हे गुन्हे नोंद केले आहेत.