ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोरया पुरस्कार स्पर्धेत तरुण मंडळांनी सहभाग व्हावे – सौ.नवोदिता घाटगे ; राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे सलग आठव्या वर्षी आयोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आयोजित ‘मोरया पुरस्कार २०२५’ स्पर्धेत तरुण मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.असे आवाहन राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले .

घाटगे पुढे म्हणाल्या,शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव कालावधीत विधायक कार्य करणाऱ्या कागल,गडहिंग्लज ,उत्तूर विधानसभा मतदारसंघातील तरुण मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सलग आठव्या वर्षी या स्पर्धा घेण्यात येत आहेत.त्यास मंडळांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.यावर्षीही या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

यामध्ये गणेश मूर्ती,आरास सजावट,ऐतिहासिक सजीव देखावा,सामाजिक कार्य,तांत्रिक देखावा,गणेश विसर्जन मिरवणूक अशा विविध विभागातील विजेत्यांना मोरया पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा कागल शहर,गडहिंग्लज शहर,मुरगुड शहर, सिद्धनेर्ली,चिखली, कसबा सांगाव, बोरवडे, सेनापती कापशी, कडगाव-कौलगे व उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघवाईज स्वतंत्र राहणार आहे .स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तरुण मंडळांनी मंगळवार(ता.२)पर्यंत नोंदणी करावी.असे आवाहन घाटगे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks