सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘ रोजगारोन्मुख ‘ हिंदी विषयावर मार्गदर्शन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात दि. २५ -०८- २५ रोजी हिंदी विभागाच्या वतीने ‘ रोजगारोन्मुख ‘ हिंदी या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये हिंदी विभागाचे प्रा. बी के सारंग यांनी रोजगारोन्मुख हिंदी या विषयावर विचार मांडत असताना हिंदी भाषेतील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले .
यामध्ये हिंदी अनुवाद सोशल मीडिया ,पत्रकारिता, पटकथा लेखन ,ब्लॉग लेखन ,हिंदी सॉफ्टवेअर ,प्रतियोगी परीक्षा मध्ये हिंदी भाषेचे महत्त्व तसेच कंटेंट लेखन ,सरकारी बँक ,न्यायिक सेवा सिविल सर्विस ,रेल्वे इत्यादी क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक संध्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य शिवाजीराव होडगे यांनी हिंदी विभागामार्फत आयोजित केलेला हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार काढले .या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. एच एम सोहनी यांनी केले .यावेळी त्यांनी प्रास्ताविक मांडत असताना हिंदी भाषेचे महत्व तसेच हिंदी भाषेमध्ये पदवी ,उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर रोजी रोटी मिळवण्याच्या विविध क्षेत्रांची माहिती सांगितली .कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी श्वेता पाटील हिने केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अशोक पाटील यांनी केले.कार्यक्रमासाठी बी ए भाग -एक ,दोन ,तीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.