पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया विद्यार्थी जनजागृती संकल्प उपक्रमात प्राचार्य शिवाजी होडगे यांचे आवाहन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शाळा- महाविद्यालयातर्फे “हरित गणेश, सुरक्षित गणेश” हा संदेश देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत . त्याचाच एक भाग म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात पर्यावरण संसाधन केंद्रामार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया या उपक्रमांतर्गत विद्यार्थी जनजागृती संकल्प उपक्रम घेण्यात आला.
सुरुवातीस कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. दादासाहेब सरदेसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक करून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर महाविद्यालयातील प्रा. दीपक साळुंखे यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा. याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी आपल्या मनोगतात ‘हरित गणेश, सुरक्षित गणेश’ हा संदेश दिला. तसेच पर्यावरणीय प्रदूषणाला आळा घालून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. दिगंबर गोरे, प्रा. डॉ. गुरुनाथ सामंत, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. अवधूत पाटील, प्रा. डॉ. अशोक पाटील, प्रा. राहुल बोटे, प्रा. संदीप मोहिते, प्रा. स्वप्निल मेंडके, प्रा .एस. आर. पाटील, प्रा. बाबुराव सारंग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार कॉमर्स फॅकल्टी हेड प्रा. विनोद प्रधान यांनी मांडले.