राजे बँकेने छोट्या ग्राहकांना केंद्रस्थानी मोठे केले-राजे समरजितसिंह घाटगे ; राजे बँकेचा शाखा स्थलांतर सोहळा उत्साहात
निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कार्पोरेट बँका मोठ्या ग्राहकांना सेवा देताना छोट्या ग्राहकांकडे दुर्लक्ष करतात.मात्र राजे बँकेने अशा छोट्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना प्रोत्साहन देऊन मोठे केले.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे शतकमहोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या वकील कॉलनीमध्ये झालेल्या शाखा स्थलांतर सोहळ्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे होत्या.
घाटगे पुढे म्हणाले,सहकारामध्ये मोठी ताकद आहे हे ओळखून शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू ग्रुपमधील सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी आणता येते हे कृतीतून दाखवून दिले. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत असताना मोठ्या बँकांशी स्पर्धा न करता जिथे इतर बँका पोहोचलेल्या नाहीत तिथे राजे बँक पोहोचून सेवा देत आहे.
अध्यक्षीय मनोगतात सौ.घाटगे म्हणाल्या, तत्पर,विनम्र व पारदर्शी सेवेतून राजे बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. यापुढेही अधिकाधिक ग्राहकाभिमुख चांगल्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहोत.
माजी नगराध्यक्षा सौ.स्वाती कोरी म्हणाल्या,शाहू साखर कारखान्यासह शाहू ग्रुप सहकारातील महामेरू म्हणून ओळखला जातो.स्वर्गीय विक्रमसिंहराजे साहेब यांच्या पश्चात त्यांचा सहकारातील मानदंडाचा वारसा घाटगे पती-पत्नींनी पारदर्शक कारभार, ग्राहकाभिमुख सेवा, उद्यमशील तरुणांना प्रोत्साहन या जोरावर जोपासला आहे.अशा नेतृत्वाची विधानसभेत आवश्यकता आहे.
यावेळी शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील शिंत्रे,नितीन माने,रोहित येसादे, रोहित धुरे,भाऊसो मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोड साखरचे संचालक बाळासाहेब मोरे,आण्णासाहेब पाटील(खातेदार),माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बरगे,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुक्याध्यक्ष बसवराज आजरी,मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले,चंद्रकांत गोरुले,जनार्दन निऊंगरे, प्रकाश पाटील, रमेश ढोणुक्षे,काशिनाथ देवगोंडा, अजित पाटील,अजित खोत, रणजीत गाडे, उदय कदम,बाबासाहेब पाटील,अनंत कुलकर्णी,प्रकाश कुंभार,रामदास कुराडे, शंभुराजे देसाई,शहाजी पाटील,धोंडीराम सावंत,सुनील गुरव,उज्वला दळवी,प्रताप सरदेसाई,सुभाष चराटी,युवराज बरगे, आनंदी चव्हाण,सुदर्शन चव्हाण,अजित पाटील,प्रताप मोहिते,संजय पाटील आदी उपस्थित होते.राजे बँकेचे संचालक रवींद्र घोरपडे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष उमेश सावंत यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यपुर्व काळात सहकाराचा उगम कागलमध्ये…..
शिवराज शिक्षण संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या जन्मोत्सवानिमित्त तेव्हाच्या कागल सहकारी पतपेढी अनलिमिटेड व आताच्या राजे बँकेची स्थापना झाली.त्यामुळे सहकाराचा उगम कागल तालुक्यात झाला आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा सहकाराला प्रोत्साहन देण्याचा वारसा स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी यशस्वीपणे चालवला.हीच परंपरा समरजितसिंह घाटगे चालवीत आहेत.याचे समाधान वाटते .