मुरगूड नगरपालिकेच्या वाढीव घरफाळा व पाणीपट्टी संदर्भात नारिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड (ता.कागल) शहरांमधील नागरिकांना यावर्षी आलेल्या घरफाळा आणि पाणीपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले.अनेक नागरिकांना थकीत फाळा दाखवून ज्यादा घरफाळा आणि पाणीपट्टी आकारणी बिले आली आहेत. या वाढीव कराच्या विरोधात आज मुरगूड शहरातील नागरिकांनी एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना याबाबतचे निवेदन दिले व या सर्व प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी केली.
मुरगुड शहरातील नागरिक हे दरवर्षी या वाढीव कराच्या विरुद्ध आवाज उठवत असतात. मुरगुड नगरपालिका ही ‘क ‘ वर्ग नगरपालिका आहे .या ठिकाणची अनेक कुटुंबे ही हातावरचे पोट घेऊन जगणारी आहेत. अल्प उत्पन्न असणाऱ्या या कुटुंबांना वाढीव कराचा मोठा फटका बसत आहे तसेच शहरातील इतरही अनेक कुटुंबे ही शेतीवर उधरनिर्वाह करतात.त्यामुळे हे वाढीव कर भरणे त्यांना अशक्य होत आहे .त्यामुळे नागरिकांनी आज मुख्याधिकारी यांचेकडे या गोष्टीचे लक्ष वेधत परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन वाढीव कर पूर्ववत मागील प्रमाणे करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी समीर गोरुले, अमर सणगर, सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट,शशिकांत चौगले, सुनील गायकवाड,संतोष दबडे, सिकंदर जमादार, विजय बारड, पांडुरंग खंडागळे, पांडुरंग ढेरे, दिलीप शेणवी यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.