ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड येथील श्री गणेश नागरी पत संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ता. कागल येथील श्री. गणेश नागरी सह पतसंस्था मर्या या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२४ इ. रोजी साई आखाडा हॉल मुरगूड येथे पार पडली. त्यावेळी उपस्थित सर्व सभासद बंधु-भगिनींचे उत्साहाने स्वागत करणेत आले.

सदर वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात संस्थेचे सभापती सोमनाथ यरनाळकर व सर्व संचालक मंडळ यांचे हस्ते श्री. गणेश फोटो पुजन व दिप प्रज्वलनाने करणेत आली. प्रथमतः अहवाल सालात संस्थेचे सभासद, ठेवीदार व हितचिंतक, देशाच्या सीमवेर शहीद झालेले जवान यांना श्रध्दांजली वाहणेत आली. नंतर संस्थेचे संस्थापक चेअरमन उदयकुमार शहा यांनी उपस्थित सर्व सभासद बंधु-भगिनींचे स्वागत केले.

यानंतर मारुती विठू जाधव यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी सदस्यपदी निवड व शंकर संतराम पाटील यांनी संस्थेच्या कर्ज वसुली कामी अतिशय उत्कृष्ठ काम केलेबद्दल आणि कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्ड संचालक पदी निवड झालेबद्दल दिपक महादेव माने व प्रविण पांडुरंग सुर्यवंशी यांचा सत्कार तसेच राहुल शामराव शिंदे व सुनिल साताप्पा कांबळे यांची कागल तालुका पत संस्था फेडरेशनच्या संचालक पदी निवड झालेबद्दल कु. प्रणव कृष्णात मोरे यांची खेलो इंडीया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळवलेबद्दल या सर्वांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करणेत आला. तसेच प्रतिवर्षाप्रमाणे संभासदांच्या इ.१० वी व १२ वी च्या परिक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही बक्षीस देऊन सत्कार करणेत आला.

यानंतर संस्थेचे विद्यमान चेअरमन सोमनाथ यरनाळकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी दिवंगत खासदार मंडलिक साहेब यांच्या आशिर्वादाने आणि त्यानी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे संस्था आज प्रगती पथावर काम करत असेलेचे नमुद केले. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतची संस्थेची आर्थिक स्थीती विशद केली व भविष्यकाळात अशाच प्रकारे संस्थेची उतरोत्तर प्रगती होत राहील अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली. यानंतर रितसर अहवाल वाचन संस्थेचे कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी केले. सभासदांनी सभेमधील १ ते १२ विषयांनी कोणत्याही प्रकारची हरकत न घेता मंजुरी दिली.

यावेळी सभेमध्ये प्रश्नोउत्तराच्या वेळी संस्थेचे सभासद जयसिंग भोसले, आप्पासो कांबळे, पांडुरंग दरेकर, सौ. स्मिता भिलवडीकर, मधुकर मंडलिक यांनी भाग घेतला.
सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडली. सर्व सभासदांचे, ठेवीदारांचे व हितचिंतकांचे आभार संचालक उदयकुमार शहा यांनी मांडले.

यावेळी उपसभापती राजाराम कुडवे संचालक आनंद देवळे,सुखदेव येरुडकर, आनंदा जालिमसर, रुपाली शहा, एकनाथ पोतदार , मारुती पाटील, प्रकाश हावळ, दत्तात्रय कांबळे, रेखा भोसले यांचेसह कार्यकारी संचालक राहुल शिंदे व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सात्ताप्पा चौगले यांनी केले.

 

संस्थेची सांप्पतिक स्थिती (दि.३१/०३/२०२५ अखेर)

➤ वसुल भागभांडवल ४४ लाख ८० हजार

> राखीव व इतर निधी ११ कोटी ३९ लाख

> ठेवी – ११६ कोटी ०४ लाख

कजें ९१ कोटी ७० लाख

> गुंतवणूक – ४२ कोटी ४७ लाख

(पैकी सोनेतारण कर्ज ३४ कोटी २४ लाख)

> खेळते भांडवल – ९३६ कोटी ५७ लाख

> निव्वळ नफा २ कोटी २६ लाख

एकूण व्यवहार – ६१९ कोटी ९७ लाख

डिव्हीडंड – १५%

> ऑडीट वर्ग ‘अ’ (मार्च २०२७)

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks