मुरगूड येथील मंडलिक संकुलच्या अपेक्षा पाटील आणि अमृता पुजारीची जागतिक कुस्ती चाचणी साठी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या (SAI) महिला कुस्तीगीर अपेक्षा पाटील व अमृता पुजारी यांना ६५ किलो व ६८ किलो गटातील कुस्तीच्या जागतिक निवड चाचणी ची संधी प्राप्त झाली आहे. ही चाचणी २३ वर्षाखालील महिला कुस्तीगीरांसाठी असणार आहे.
या वयोगटात त्यांनी झारखंड मधील रांची सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली आहे. दोघींनाही कास्यपदक मिळाले आहे. उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटक येथील महिला कुस्तीगीरांच्यावर विजय संपादन केला आहे.
पुढील महिन्यात त्यांची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी चाचणी होणार आहे. त्यात त्यांची निवड झाली तर या वरिष्ठ वयोगटात साई संकुलाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचू शकेल असे त्यांचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दादासो लवटे यांनी सांगितले. सद्या भारतीय संघाच्या सराव शिबिरात त्या सराव करतील.