ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात औषधी वनस्पतींची लागवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
औषधी वनस्पती मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. आरोग्य संवर्धन, रोग निवारण, सौंदर्यवर्धन आणि पर्यावरण संतुलन या सर्व दृष्टीने त्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
या दृष्टीने पर्यावरण संसाधन केंद्रामार्फत महाविद्यालयातील बोटॅनिकल गार्डनमध्ये गुळवेल, मीटतुळस, इन्सुलिन, ओवा, ब्राह्मी, शतावरी, हाडजोड इ. विविध औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे, पर्यावरण संसाधन केंद्राचे समन्वयक प्रा.दादासाहेब सरदेसाई पर्यावरणशास्त्राचे प्रा. दयानंद कांबळे, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. गुरुनाथ सामंत तसेच विद्यार्थी उपस्थित होते.