इस्लामपूर सखी मंच आयोजित लावणी स्पर्धेत शर्मिला वंडकर प्रथम क्रमांकाच्या मानकरी

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्रावण सोहळा इस्लामपूर सखी मंच आयोजित लावणी ,मायलेक व फॅशन शो या स्पर्धा घेण्यात आल्या .यामध्ये लावणी या स्पर्धेत 30 स्पर्धकांनी भाग घेतला होता .यामध्ये आपल्या मुरगुडच्या कलाक्षेत्रातील व डान्स ,योगा यांची आवड असणाऱ्या शर्मिला वडंकर यांनी लावणी या स्पर्धेत भाग घेऊन 30 स्पर्धकातून त्यांना पहिल्या क्रमांकाने स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
शर्मिला वंडकर यांना कलाक्षेत्रात यापूर्वीहि पुरस्कार मिळाले आहेत. त्या महिलांच्या बऱ्याच कार्यक्रमात सहभागी असतात. संगीत खुर्ची, होम मिनिस्टर अशा कार्यक्रमातून दसरा, गणपती, सण ,उत्सव यामध्ये आपले कलागुण सादर करीत असतात.
लावणी हे त्यांचं आवडतं क्षेत्र पण त्यांनी लावणी स्पर्धेत कधी आपली कला प्रकट केली नव्हती. पहिल्यांदाच आपल्या माहेरी त्यांना योगायोगाने संधी चालून आली आणि स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. त्याला त्यांची आई, भाऊ यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिले. आणि शर्मिला वंडकर यांनी स्पर्धेत प्रवेश केला. आणि त्या पहिल्यांदाच भाग घेऊन प्रथम क्रमांकाने सन्मानित झाल्या. हि मुरगूडवाचीय एक अभिमानाची गोष्ट आहे. शर्मिला यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.