मुमेवाडी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

निकाल न्यूज प्रतिनिधी :
मुमेवाडी ता.आजरा येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्राथमिक विद्यामंदिर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या शुभहस्ते पार पडला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. दरम्यान, ग्रामपंचायत मुमेवाडी येथे ध्वजारोहणाचा सोहळा सरपंच सौ. आनंदी परीट यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील अंगणवाडी सेविका मदतनीस व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्याच्या स्मृतींना उजाळा देत सर्वांनी ‘भारत माता की जय’, जय जवान जय किसान च्या घोषणा दिल्या. स्वागत एकनाथ पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक गुरव सर यांनी केले.
यावेळी देवचंद कॉलेज चे माजी प्राध्यापक व्ही. जी. घाटगे यांच्या वतीने शाळेला क्रीडा साहित्य देण्यात आले. तसेच ग्रामपंचायत, माजी मुख्याध्यापक विठ्ठल भिऊंगडे व आनंदा भिऊंगडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच श्री संत बाळूमामा दूध संस्था चेअरमन रामदास साठे यांच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आला.
यावेळी श्री. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती निमित्य पसायदानाचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मान्यवरांचे आभार पुंडपळ यांनी मानले.