म्हाकवे ग्रामस्थांच्या वतीने अँड राणाप्रताप सासणे यांचा नागरी सत्कार

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भौगोलिक दृष्ट्या गैरसोयीच्या सिध्दनेर्ली मतदार संघातून सुटका होवून म्हाकवे हा स्वतंत्र जिल्हा परिषद मतदार संघ व्हावा यासाठी ग्रामस्थांनी लढा उभा केला होता. त्यामध्ये आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीत अँड राणाप्रताप सासणे यांनी अत्यंत चाणाक्षपणे बाजू मांडली. त्यामुळे म्हाकवेकरांची वाट सोपी झाली. त्याबद्दल म्हाकवे ग्रामस्थांनी अँड सासणे यांचा सत्कार करुन कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.
सदरचे काम ५ ऑगस्ट इ.रोजी आयुक्तसो, पुणे यांचेसमोर होते व ऍड सासने यांचे वडील स्व. शिवशाहीर राम सासने यांचे उत्तरकार्य ६ ऑगस्ट इ.रोजी होते पण वडिलांच्या “भावानेपेक्षा कार्याला महत्व द्या” या शिवकवणीप्रमाणे ऍड सासने यांनी प्रभावी काम चालवून म्हाकवे ग्रामस्तावरील अन्याय दूर केला.
यावेळी कृती समितीच्या अध्यक्षा वर्षा पाटील, सरपंच आशालता कांबळे, माजी जि प सदस्य शिवानंद माळी, धनंजय पाटील, बाजीराव पाटील,अजित माळी,रमेश पाटील, नितीन पाटील, शिवाजी वाडकर, हिंदुराव पाटील, ए .डी.पाटील, आदिनाथ पाटील,विठ्ठल शिंदे, रणजित लोहार आदी उपस्थित होते.