जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेकी विचार गरजेचे : डॉ.बी.एम. हिर्डेकर ; सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनीचे उदघाटन
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनीच्या उद्घाटनाच्या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बी एम हिर्डेकर म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेकी विचार गरजेचे आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे होते. महाविद्यालयातील विवेक वाहिनीचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ पी आर फराकटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सुरुवातीस प्रतीक्षा परीट व अरुणा रेपे या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले डॉ हिर्डेकर सरांनी आपल्या प्रभावी शैलीतून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले विवेकी व अविवेकी विचारसरणीची ओळख करून दिली समाजात राहताना विवेकी राहणे किती गरजेचे आहे हे अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले आपल्या अमोघ वाणीतून त्यांनी दिशाहीन होत चाललेल्या तरुणाईला योग्य दिशा देण्याचे काम केले विवेकाचे महत्त्व पटवून दिले प्राचार्य शिवाजीराव होडगे यानीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विवेक वहिनीचे सदस्य प्रा.नितेश रायकर, डॉ, ए.डी.जोशी, प्रा. दादासाहेब सरदेसाई, प्रा.विनोद प्रधान,प्रा. तानाजी सातपुते,प्रा सामंत, प्रा सुखदेव एकल, सुशांत पाटील, प्रा हेरवाडे, प्रा कांबळे, प्रा गोरूले,प्रा स्वप्नील मेंडके, प्रा सारंग प्रा डाफळे, प्रा आर.एस पाटील, प्रा बोटे,डॉ सौ एम.एस.पाटील, डॉ.सौ. कुंभार,डॉ. सौ.सामंत प्रा.सौ. सावेकर,साताप्पा कांबळे,सतीश खराडे इत्यादी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक वाहिनीच्या सदस्या प्रा,सौ,अर्चना कांबळे यांनी केले तर आभार सदस्य प्रा. अशोक पाटील यांनी मानले.